अटी व शर्ती:
1. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, सह्याद्रीतील भटकंती, ट्रेकिंग, किल्ले, निसर्ग, वाटा, अनुभव किंवा एखाद्या अविस्मरणीय भटकंतीवर आधारित लेख स्वीकारले जातील.
2. लेख स्वतःचा अनुभव व स्वतःच्या शब्दांत लिहिलेला असावा.
3. लेखाची शब्दमर्यादा ८०० ते १००० शब्द इतकीच असावी.
4. लेखास योग्य असे शीर्षक देणे आवश्यक आहे.
5. लेख मराठी भाषेत असावा. शुद्धलेखन, भाषा, मांडणी आणि साहित्यिक अभिव्यक्तीला प्राधान्य दिले जाईल.
6. लेखामध्ये अनुभवाची सत्यता, आशय, निवेदनशैली, संवेदनशीलता आणि सह्याद्रीशी असलेले नाते यांचा विचार केला जाईल.
7. लेखासोबत स्पर्धकाचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल (असल्यास) नमूद करणे आवश्यक आहे.
8. लेख यापूर्वी प्रकाशित किंवा कोणत्याही स्पर्धेत पुरस्कृत झालेला नसावा.
9. AI किंवा इतर माध्यमातून पूर्णतः तयार केलेले लेख स्वीकारले जाणार नाहीत. लेखनात स्वतःचा अनुभव आणि स्वतःची अभिव्यक्ती असणे आवश्यक आहे.
10. एक स्पर्धक एकच लेख पाठवू शकतो.
11. लेख पाठविण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२६ आहे. त्यानंतर प्राप्त झालेले लेख स्पर्धेसाठी स्वीकारले जाणार नाहीत.
12. परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वमान्य राहील.
13. लेखाच्या आशयाची जबाबदारी संबंधित स्पर्धकाची राहील. लेखातील कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा ठिकाणासंदर्भातील आक्षेपार्ह मजकुराची जबाबदारी आयोजकांची राहणार नाही.
14. स्पर्धेसाठी प्राप्त झालेले निवडक लेख सह्याद्री मित्र संमेलनाच्या स्मरणिका,सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमांमध्ये लेखकाच्या नावासह प्रकाशित करण्याचा अधिकार आयोजकांकडे राहील.
15. स्पर्धेतील पारितोषिके व निकालाची घोषणा सह्याद्री मित्र संमेलनाच्या ५ व्या वर्षाच्या कार्यक्रमात करण्यात येईल.
आयोजक :
सह्याद्री मित्र संमेलन
आयोजन समिती, नाशिक
वर्ष ५ वे
महिला विशेष वर्ष २०२७