नियम, अटी व शर्ती:
1. स्पर्धेचा विषय “किल्ल्यावरील बांधकाम शैली” असा आहे. किल्ल्यांची स्थापत्यरचना, तटबंदी, बुरुज, दरवाजे, कमानी, दगडी पायऱ्या, चोरवाटा, पाण्याची टाकी, गुहा, मंदिरे, शिल्पकाम, वास्तूंचे अवशेष आदींची छायाचित्रे स्वीकारली जातील.
2. छायाचित्रातून किल्ल्याची ऐतिहासिक वास्तुरचना, बांधकाम तंत्र किंवा स्थापत्यवैशिष्ट्य प्रभावीपणे दिसणे अपेक्षित आहे.
3. छायाचित्र स्पर्धकाने स्वतः काढलेले असावे.
4. एका स्पर्धकाला जास्तीत जास्त २ छायाचित्रे पाठविता येतील.
5. मोबाईल, डिजिटल कॅमेरा किंवा इतर कोणत्याही कॅमेऱ्याने काढलेली छायाचित्रे स्वीकारली जातील.
6. छायाचित्रामध्ये आवश्यक ते मूलभूत Editing करता येईल. मात्र मूळ वास्तुरचनेत बदल करणारे, घटक जोडणारे किंवा काढून टाकणारे अत्यधिक Editing अथवा AI-generated image स्वीकारले जाणार नाही.
7. छायाचित्रासोबत छायाचित्राचे शीर्षक, किल्ल्याचे नाव, ठिकाण, छायाचित्रकाराचे पूर्ण नाव व मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे.
8. छायाचित्र यापूर्वी कोणत्याही स्पर्धेत पुरस्कृत झालेले नसावे.
9. इंटरनेटवरून घेतलेले किंवा अन्य व्यक्तीचे छायाचित्र सादर केल्यास ते अपात्र ठरेल.
10. परीक्षण करताना Composition, प्रकाशयोजना, तांत्रिक गुणवत्ता, स्थापत्यवैशिष्ट्याची मांडणी, ऐतिहासिक वास्तूची जाण आणि छायाचित्राची कलात्मकता या बाबींचा विचार केला जाईल.
11. छायाचित्र पाठविण्याची अंतिम मुदत: १५ डिसेंबर २०२६.
12. प्राप्त झालेल्या निवडक छायाचित्रांचा आयोजकांना सह्याद्री मित्र संमेलन, छायाचित्र प्रदर्शन, स्मरणिका, सोशल मीडिया व प्रचारमाध्यमांसाठी छायाचित्रकाराच्या नावासह वापर करण्याचा अधिकार राहील.
13. किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान होईल अशा पद्धतीने छायाचित्रण करणे, चढणे किंवा कृत्रिमरीत्या दृश्य तयार करणे टाळणे आवश्यक आहे.
14. परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वमान्य राहील.
15. स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण सह्याद्री मित्र संमेलनाच्या ५ व्या वर्षाच्या कार्यक्रमात करण्यात येईल.
आयोजक:
सह्याद्री मित्र संमेलन
आयोजन समिती, नाशिक
वर्ष ५ वे
महिला विशेष वर्ष २०२७
“दगडांत कोरलेला इतिहास… कॅमेऱ्याच्या नजरेतून!”