सह्याद्री जैवविविधता - Micro Photography स्पर्धा

विषय : “सह्याद्रीतील जैवविविधता — सूक्ष्म जग”

नियम, अटी व शर्ती:

1. स्पर्धेचा विषय “सह्याद्रीतील जैवविविधता — Micro Photography” असा आहे. सह्याद्रीतील वनस्पती, फुले, पाने, बिया, कीटक, फुलपाखरे, पक्षी, सरपटणारे जीव, जलचर तसेच निसर्गातील सूक्ष्म जीवसृष्टी यांचे जवळून टिपलेले छायाचित्र स्वीकारले जातील.
2. छायाचित्रातून जैवविविधतेतील एखादा सूक्ष्म किंवा बारकासा घटक प्रभावीपणे दिसणे अपेक्षित आहे.
3. छायाचित्र स्पर्धकाने स्वतः सह्याद्री परिसरात काढलेले असावे.
4. एका स्पर्धकाला जास्तीत जास्त २ छायाचित्रे पाठविता येतील.
5. मोबाईल, Macro Lens, डिजिटल कॅमेरा किंवा इतर कोणत्याही कॅमेऱ्याने घेतलेली छायाचित्रे स्वीकारली जातील.
6. Crop, Exposure, Brightness, Contrast, Sharpness व Colour Correction यांसारखे मूलभूत Editing करता येईल. मात्र छायाचित्रातील मूळ जीवसृष्टीत बदल करणारे अत्यधिक Editing, घटकांची भर/वजाबाकी किंवा AI-generated image स्वीकारले जाणार नाही.
7. छायाचित्र काढताना वनस्पती, कीटक किंवा कोणत्याही जीवाला इजा होणार नाही, याची स्पर्धकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
8. छायाचित्रासोबत छायाचित्राचे शीर्षक, ठिकाण, शक्य असल्यास जीव/वनस्पतीचे नाव, छायाचित्रकाराचे पूर्ण नाव व मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे.
Dslr,or mobile स्पष्ट उल्लेख करावा.

9. छायाचित्र यापूर्वी कोणत्याही स्पर्धेत पुरस्कृत झालेले नसावे.
10. इंटरनेटवरून घेतलेले, अन्य व्यक्तीचे किंवा AI-generated छायाचित्र सादर केल्यास ते अपात्र ठरेल.
11. परीक्षण करताना Macro/Close-up प्रभाव, Composition, Focus, प्रकाशयोजना, तांत्रिक गुणवत्ता, जैवविविधतेचे दर्शन आणि छायाचित्रातील कल्पकता यांचा विचार केला जाईल.
12. छायाचित्र पाठविण्याची अंतिम मुदत: १५ डिसेंबर २०२६.
13. प्राप्त झालेल्या निवडक छायाचित्रांचा आयोजकांना सह्याद्री मित्र संमेलन, छायाचित्र प्रदर्शन, स्मरणिका, सोशल मीडिया व प्रचारमाध्यमांसाठी छायाचित्रकाराच्या नावासह वापर करण्याचा अधिकार राहील.
14. परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वमान्य राहील.
15. स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण सह्याद्री मित्र संमेलनाच्या ५ व्या वर्षाच्या कार्यक्रमात करण्यात येईल.

आयोजक
सह्याद्री मित्र संमेलन
आयोजन समिती, नाशिक
वर्ष ५ वे
महिला विशेष वर्ष २०२७

“सह्याद्रीच्या विराट निसर्गात… दडलेलं एक सूक्ष्म विश्व!”

कॉन्टॅक्ट फॉर्म
favicon