नियम, अटी व शर्ती:
1. रील सह्याद्रीतील भटकंती, ट्रेकिंग, किल्ले, निसर्ग, वाटा, संस्कृती किंवा भटकंतीतील अविस्मरणीय क्षणांवर आधारित असावी.
2. रील स्वतः शूट केलेली व स्वतःच्या कल्पनेतून तयार केलेली असावी.
3. रीलचा कालावधी १५ ते ३० सेकंद असावा.
4. रील Instagram Reel / Vertical Format (9:16) मध्ये असावी.
5. रीलमध्ये सह्याद्रीचे सौंदर्य, भटकंतीचा अनुभव आणि निसर्गप्रेम प्रभावीपणे मांडलेले असावे.
6. रीलमध्ये प्लास्टिक कचरा, निसर्गाची हानी, ध्वनीप्रदूषण, मद्यपान किंवा असुरक्षित/धोकादायक कृत्यांचे प्रदर्शन करणारा आशय नसावा.
7. रीलमध्ये वापरलेले संगीत, फोटो, व्हिडिओ किंवा इतर साहित्य कॉपीराइट नियमांचे उल्लंघन करणारे नसावे.
8. एका स्पर्धकाला एकच रील स्पर्धेसाठी पाठवता येईल.
9. रीलसोबत स्पर्धकाचे पूर्ण नाव व मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे.
10. रील यापूर्वी कोणत्याही स्पर्धेत पुरस्कृत झालेली नसावी.
11. रीलमध्ये AI-generated किंवा इतरांच्या तयार साहित्याचा मुख्य आशय म्हणून वापर करता येणार नाही. स्वतःची भटकंती आणि स्वतःचे चित्रीकरण याला प्राधान्य असेल.
12. रील पाठविण्याची अंतिम मुदत : १५ डिसेंबर २०२६.
13. परीक्षण करताना आशय, कल्पकता, चित्रीकरण, संकलन, कथनशैली, दृश्यात्मकता आणि सह्याद्रीशी असलेले नाते या बाबींचा विचार केला जाईल.
14. परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वमान्य राहील.
15. स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या निवडक रील्सचा आयोजकांना सह्याद्री मित्र संमेलनाच्या सोशल मीडिया व प्रचारमाध्यमांवर लेखक/निर्मात्याच्या नावासह वापर करण्याचा अधिकार राहील.
16. स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण सह्याद्री मित्र संमेलनाच्या ५ व्या वर्षाच्या कार्यक्रमात करण्यात येईल.
आयोजक :
सह्याद्री मित्र संमेलन
आयोजन समिती, नाशिक
– वर्ष ५ वे
महिला विशेष वर्ष २०२७
सह्याद्रीच्या वाटा…
कॅमेऱ्यातूनही अनुभवू देऊया!