सह्याद्री छायाचित्रण स्पर्धा

विषय: “सह्याद्री लॅण्डस्केप”
(Landscape photography)

नियम, अटी व शर्ती:

1. स्पर्धेचा विषय “सह्याद्री लॅण्डस्केप” असा असून, सह्याद्री पर्वतरांगांचे डोंगर, दऱ्या, कडे, घाटवाटा, आकाश, ढग, धबधबे, जलाशय, जंगल आणि निसर्गदृश्ये यांचे लॅण्डस्केप छायाचित्र स्वीकारले जातील.
2. छायाचित्र स्पर्धकाने स्वतः काढलेले असावे.
3. एका स्पर्धकाला जास्तीत जास्त २ छायाचित्रे पाठविता येतील.
4. छायाचित्र Landscape Photography या संकल्पनेशी सुसंगत असावे. व्यक्ती किंवा केवळ एखाद्या वस्तूचे Close-up छायाचित्र ग्राह्य धरले जाणार नाही.
5. मोबाईल, डिजिटल कॅमेरा किंवा इतर कोणत्याही कॅमेऱ्याने काढलेले छायाचित्र स्वीकारले जाईल.
6. छायाचित्रामध्ये मूलभूत Editing जसे Crop, Exposure, Brightness, Contrast, Colour Correction इत्यादी करता येईल. मात्र छायाचित्राचा मूळ आशय बदलणारे अतिरिक्त/कृत्रिम घटक जोडणे, AI-generated image किंवा अत्यधिक manipulation स्वीकारले जाणार नाही.
7. छायाचित्रासोबत छायाचित्राचे शीर्षक, ठिकाण, छायाचित्रकाराचे पूर्ण नाव व मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे.
8. छायाचित्र यापूर्वी कोणत्याही स्पर्धेत पुरस्कृत झालेले नसावे.
9. कॉपी केलेले, इंटरनेटवरून घेतलेले किंवा अन्य व्यक्तीचे छायाचित्र स्पर्धेसाठी पाठविल्यास ते अपात्र ठरविण्यात येईल.
10. छायाचित्राचे परीक्षण करताना रचना (Composition), प्रकाशयोजना, दृश्यात्मकता, रंगसंगती, कल्पकता, तांत्रिक गुणवत्ता आणि सह्याद्रीचे लॅण्डस्केप प्रभावीपणे मांडण्याची क्षमता यांचा विचार केला जाईल.
11. छायाचित्र पाठविण्याची अंतिम मुदत : १५ डिसेंबर २०२६.
12. स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या निवडक छायाचित्रांचा आयोजकांना सह्याद्री मित्र संमेलन, स्मरणिका, प्रदर्शन, सोशल मीडिया व प्रचारासाठी छायाचित्रकाराच्या नावासह वापर करण्याचा अधिकार राहील.
13. परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वमान्य राहील.
14. स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण सह्याद्री मित्र संमेलनाच्या ५ व्या वर्षाच्या कार्यक्रमात करण्यात येईल.

आयोजक:
सह्याद्री मित्र संमेलन
आयोजन समिती, नाशिक
वर्ष ५ वे
महिला विशेष वर्ष २०२७


“सह्याद्री… एका फ्रेममध्ये सामावलेला!”

कॉन्टॅक्ट फॉर्म
favicon