नियम, अटी व शर्ती:
1. स्पर्धेचा विषय सह्याद्रीतील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असा आहे.
2. लेखामध्ये खालीलपैकी कोणत्याही वारसास्थळाचा अभ्यासपूर्ण दस्तऐवज सादर करता येईल:
* गडकिल्ले 🏰
* लेण्या / गुंफा
* पुरातन मंदिरे
* ऐतिहासिक घाटवाटा
* तसेच संबंधित ऐतिहासिक वास्तू व वारसास्थळे.
3. लेखासाठी शब्दमर्यादा नाही. आवश्यकतेनुसार सविस्तर माहिती, संदर्भ, छायाचित्रे, नकाशे, रेखाचित्रे किंवा इतर पूरक माहिती जोडता येईल.
4. दस्तऐवजात शक्य असल्यास स्थळाचा इतिहास, भौगोलिक स्थान, स्थापत्य वैशिष्ट्ये, ऐतिहासिक संदर्भ, स्थानिक परंपरा, लोककथा, सद्यस्थिती आणि संवर्धनाची गरज यांचा समावेश करावा.
5. माहिती शक्य तितकी विश्वसनीय संदर्भांवर आधारित असावी. संदर्भग्रंथ, जुने दस्तऐवज, शिलालेख, स्थानिक जाणकार किंवा अन्य स्रोतांचा वापर केला असल्यास त्यांचा उल्लेख करावा.
6. दस्तऐवज स्वतःच्या अभ्यासातून व स्वतःच्या शब्दांत तयार केलेला असावा.
7. एक स्पर्धक एकच वारसा दस्तऐवज सादर करू शकतो.
8. दस्तऐवजासोबत लेखकाचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल (असल्यास) देणे आवश्यक आहे.
9. दस्तऐवजासोबत दिलेली छायाचित्रे स्वतः काढलेली असल्यास त्यास प्राधान्य दिले जाईल. अन्य स्रोतांतील छायाचित्रे वापरल्यास त्यांचा योग्य संदर्भ देणे आवश्यक आहे.
10. इंटरनेट किंवा अन्य प्रकाशित साहित्यामधून मजकूर जसाच्या तसा कॉपी केलेला आढळल्यास लेख अपात्र ठरविला जाऊ शकतो.
11. परीक्षण करताना अभ्यासाची खोली, माहितीची अचूकता, संदर्भ, मांडणी, लेखनशैली, विषयाची व्याप्ती आणि वारसा संवर्धनाची जाणीव या बाबींचा विचार केला जाईल.
12. दस्तऐवज सादर करण्याची अंतिम मुदत : १५ डिसेंबर २०२६.
13. स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या निवडक लेखांचा आयोजकांना सह्याद्री मित्र संमेलनाच्या स्मरणिका, प्रदर्शन, डिजिटल माध्यमे व अन्य प्रचारमाध्यमांमध्ये लेखकाच्या नावासह वापर करण्याचा अधिकार राहील.
14. परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वमान्य राहील.
15. स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण सह्याद्री मित्र संमेलनाच्या ५ व्या वर्षाच्या कार्यक्रमात करण्यात येईल.
आयोजक:
सह्याद्री मित्र संमेलन
आयोजन समिती, नाशिक
वर्ष ५ वे
महिला विशेष वर्ष २०२७
“वारसा फक्त पाहायचा नसतो… तो समजून घ्यायचा, जपायचा आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असतो.”