आनंद पाळंदे

Trek the Sahyadri
हरिश कपाडिया सरांच्या या
सह्याद्री ग्रंथानंतर कुठला ग्रंथ
सर्व भटक्यांना प्राणप्रिय असेल तर
तो ” डोंगरयात्रा “

डोंगरयात्रा.. ज्याच्या दारी नाही
तो कसला भटक्या..!
जून्या सुसंस्कृत घरात गीता, हरिपाठ
हि धार्मिक ग्रंथ संपदा नसेल तरचं नवल.
तसचं आमचं हे.

सोशल मीडियाचा जन्मा अगोदर
Trek the Sahyadri आणि
डोंगरयात्रा आणि सांगाती सह्याद्री हि
ग्रंथे डोळ्यासमोर घालत आम्ही सह्याद्री
भटकलोय..
आनंदाचे उत्सव साजरे केले.
सह्याद्री धर्म पाळत राहिलो..
ते डोंगर यात्रा कारणें..!!!

पाळंदे काका म्हणजे दिपस्तंभा सारखं
व्यक्तिमत्व..सालस…लोभस
अगदी निष्काम योग्या सारखं.
स्वच्छ.. निर्मळ..प्रवाही.
खळखळतं…हलतं…डुलतं

सरकारी नोकरी सांभाळून सह्याद्रीचा
कानाकोपरा फिरणं काय साधी गोष्ट आहे…?
कुठलाही सोर्स उपलब्ध नसतांना..
दळणवळणाची साधने अपुरी असताना..
हा भटकण्याचा खडतर यज्ञ तेवत ठेवणे
काय एवढे सोपे होतं..?

भटकण्याचा आनंद दूस-याच्या
झोळीत टाकण्याचे योगीकाम काकांनी
निस्वार्थीपणे केलंय हे सांगण्यास कोण
ज्योतिषाची गरज ?

ज्ञान वाटणे सोपे पण आनंद वाटणे
वाटते तेवढे सोपे नाही.. त्रिवार नाही
तेही चोफेर लिहिते होतं..
आपल्या वाणीने मुग्ध करत ते
फुलपाखरासारखे जगत आले.

आणि आज..
ते हे झगमगते भटक्यांचे विश्व
न्याहाळत कुठेही नकारात्मक वाटेला
गेले नाहीत.
सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ते
नव्यांच्या पाठीवर हात ठेवत..
लढ… म्हणतं राहिले..

म्हणून तो ” आनंद ..
सह्याद्री रत्न आहे…