
५ वे सह्याद्री मित्र संमेलन २०२७
महिला विशेष ट्रेक — किल्ले शिवनेरी
सह्याद्रीच्या वाटा… आता तिच्याही!
दिनांक : रविवार, २५ ऑक्टोबर २०२६
महिला विशेष वर्ष २०२७ च्या निमित्ताने आयोजित महिला विशेष ट्रेक उत्साहात पार पडला. या उपक्रमात ४० हून अधिक उत्साही महिला आणि १० हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले.
शिवनेरीच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात गडभ्रमंतीला सुरुवात झाली. प्रसन्न वातावरण आणि सह्याद्रीचं निसर्गसौंदर्य यांमुळे हा प्रवास अधिकच आनंददायी ठरला.
किल्ल्याची भव्य वास्तुरचना, टप्प्याटप्प्याने उभारलेली प्रवेशद्वारे, मजबूत तटबंदी आणि पाण्याच्या साठवणुकीचं उत्तम नियोजन पाहून तत्कालीन स्थापत्यकौशल्याची प्रचिती आली. किल्ल्यावरील स्वच्छताही विशेष लक्ष वेधून घेत होती.
शिवजन्मस्थळाला भेट देताना मन अभिमानाने आणि भावनेने भरून आलं. स्वराज्याच्या प्रेरणास्थानाचं दर्शन घेतल्यानंतर शिवाई देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन सर्वांनी परतीचा मार्ग धरला.
हा ट्रेक केवळ गडभ्रमंती नव्हता, तर निसर्गाचा आनंद घेत, इतिहासाशी नातं जोडत आणि महिला सक्षमीकरणाच्या भावनेला बळ देणारा एक अविस्मरणीय अनुभव होता.
५ वे सह्याद्री मित्र संमेलन
९ व १० जानेवारी २०२७
आयोजक : सह्य मित्र फाऊंडेशन, नाशिक










